Breaking


जुन्नर : खडकवाडी येथे अंगणवाडी शाळेचे नूतन इमारतीचा उद्घाटन, गणवेश व स्कूल बॅग संपन्न !


जुन्नर : आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2021 रोजी  खडकवाडी, चावंड येथे  एकात्मिक विकास  प्रकल्प योजनेतून  अंगणवाडी शाळेचे नूतन इमारतीचे उदघाटन  प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. या इमारतीसाठी अनिल शंकर घुटे यांनी  विनामूल्य जागा दिली.

 
या  नूतन  इमारतेचे  उदघाटन अनिल  घुटे  यांच्या हस्ते करण्यात आले तर खेमचंद  शेळकंदे यांनी पूजा करून नारळ फोडले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चावंड गावचे सरपंच रामदास भालचिम हे होते. तर प्रमुख पाहुणे  म्हणून ऋषिकेश परिवाराचे अध्यक्ष सुरेश  जोशी, उपाध्यक्ष तुकाराम  रावते, कार्याध्यक्ष  गणपत जोशी, तसेच प्रकल्प  संचालक दाजी  लांडे हे उपस्थित होते.

ऋषिकेश परिवार संस्थेच्या वतीने अंगणवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांना गणवेश आणि प्राथमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॅग चे वाटप करण्यात आले.                 

या  कार्यक्रमानिमित्त माजी तंटामुक्ती अध्यक्ष शंकर शेळकंदे, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बांबळे, चावंड गावचे पेसा अध्यक्ष राजू कोळप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष  अविनाश शेळकंदे, सामाजिक कार्यकर्ते शरद हिले, धोंडू शेळकंदे, कैलास साबळे, काळू साबळे, संतोष हिले तसेच महिला आणि  ग्रामस्थ आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्र संचालन गणपत जोशी यांनी केले तसेच राजू कोळप आणि जी. एस. बेकारी यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले. शिवाजी बांबळे यांनी  आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता  झाली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा