Breaking


जुन्नर: प्रहार दिव्यदृष्टी दिव्यांग संघटनेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटनजुन्नर, ता.५ : जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तीकरण केंद्र महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजुरी गावात प्रहार दिव्यदृष्टी दिव्यांग संघटनेच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आज (ता. ५) करण्यात आले.


यावेळी दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, सोडचिठ्ठी झालेले, निराधार, अनाथ लोकांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी व शासनाच्या विविध योजना याची माहिती देण्यासाठी माहिती केंद्र सुरू करण्यात आले. त्यावेळी महिला भगिनींना भाऊबीज दिपावलीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी राजुरी गावचे सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके, ग्रामपंचायत सदस्य गौरव घंगाळे, शाकीर चौगुले, रंगनाथ औटी, एकनाथ शिंदे,  सखाराम गाडेकर, म.गांधी तंटामुक्ती अध्यक्ष संदिप औटी, भारतीय ग्राहक पंचायत संघटन मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब औटी, बेल्हा येथील समर्थ पॉलिटेक्निकचे विश्वस्त वल्लभ शेळके, युनिटी महिला बचत गटच्या अध्यक्षा हेमलता शिंदे, अश्विनी हाडवले, पारनेर प्रहार तालुका अध्यक्ष अरविंद नरसाळे, उपाध्यक्ष नारायण काणे, सचिव उमेश  पवार, प्रहार जनशक्ती रूग्ण सेवक व श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता भिमाजी मालुसकर यांनी उपस्थित पदाधिकारी व सर्वाचे आभार मानून केली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा