Breaking


जुन्नर : ओंकार मुंढे याची आयआयटी मध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार समारंभ संपन्न !


जुन्नर : खटकाळे येथील ओंकार मुंढे याची आयआयटी मध्ये निवड झाल्याबद्दल शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा खटकाळे, ग्रामपंचायत खटकाळे - खैरे तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला मोरे होत्या. 


यावेळी यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. विलास नायकवडी यांनी विद्यार्थ्यांना अनिमिया, आहार याबाबत मार्गदर्शन केले, तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सुरेश घोळवे यांनी विद्यार्थ्यांना आयआयटी बद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी ओंकार प्रमाणे यश संपादन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन घोळवे यांनी केले.यावेळी बोलताना कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतला मोरे म्हणाल्या, संकेतप्रमाणे इतर विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले पाहिजे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवका मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक साबळे यांनी केले.


यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे नवनाथ मोरे, बाळू भवारी, संजय गागरे यांच्यासह शिक्षकवृंद सोमा मुंढे प्रा. इंद्रजीत वीर, प्रा. श्रीमती सुमित्रा ढोमसे, दिलीप लोंढे, सोमा मुंढे, प्रवीण गाढवे, ज्ञानेश्वर भालेकर, संभाजी सूर्यवंशी, कुंडलिक रायकर, अप्पा भोईर, सचिन थोरात, अधीक्षक किरण कानडे, अधिक्षिका श्रीमती स्वाती सोमकुवर आदीसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा