Breaking


जुन्नर : ग्रामपंचायत चावंडच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी रघुनाथ रामभाऊ चौधरी यांची निवड !


जुन्नर : संयुक्त ग्रामपंचायत चावंड, खडकवाडी, केळी आणि माणकेश्वर येथे 26 ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत रघुनाथ रामभाऊ चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

         
रघुनाथ चौधरी हे जेष्ठ व्यक्ती, प्रगतशील शेतकरी, दुधउत्पादक आणि शांत व संयमी व्यतिमत्व आहे. गेली अनेक वर्षे त्यांना सामाजिक व राजकीय कार्याचा अनुभव असून गावातील प्रत्येक कार्यक्रम, सण उत्सव आणि सुख दुःखात ते नेहमी सहभागी असतात. 

त्यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माणकेश्वर गावचे पोलीस पाटील रोहिदास कोरडे, उपसरपंच माधुरीताई कोरडे तसेच सर्व ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा