Breaking


जुन्नर : नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन !


जुन्नर : नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया त्वरित रावबून विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करा व इतर मागण्यांना घेऊन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.


स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने नवीन शैक्षणिक धोरणाला विरोध केला आहे. विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करणारी नीट परिक्षा रद्द करा, मागील व चालू वर्षांचे राज्यातील सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व परिक्षा शूल्क माफ करा, वसतिगृह प्रवेश प्रक्रिया त्वरीत राबवून विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करा, आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप सुरू करा, एस. टी. कामगारांच्या प्रश्नावर लवकर तोडगा काढून विद्यार्थ्यांची बसमुळे होणारी अडचण दूर करा, विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती, फेलोशिप, स्वाधार योजनेची रक्कम त्वरित अदा करा, सर्व विद्यार्थ्यांना मोफत बस पास व रेल्वे पास द्या, खाजगी कोचिंग क्लासेसच्या शुल्कवाढीवर नियंत्रण आणणार कायदा करा आदी मागण्या करण्यात आल्या.

निवेदन देतेवेळी एसएफआय चे राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे, राज्य कमिटी सदस्य राजू शेळके, रोहिदास बोऱ्हाडे आदीसह उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा