Breaking







महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर


मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.


ही नियुक्ती निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा