Breakingशासनाच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करूया - प्रा.दिपक जाधवपिंपरी चिंचवड, ता. २५ : केंद्र आणि राज्य सरकारच्या समाज कल्याण, महिला बालविकास विविध आर्थिक आणि शैक्षणिक सबलीकरणाच्या योजना सामान्य लोकांना माहीत नसतात. या योजनेचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. विधवा, परीतक्त्या, अपंग, निराधार, जेष्ठ नागरिक यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे कार्य आपण सर्वांनी केले पाहिजे, असे प्रतिपादन विपला फाउंडेशनचे समन्वयक विनोद भालेराव यांनी   बुद्ध विहार, बालाजी नगर, भोसरी येथील पालक, विद्यार्थी यांच्या मेळाव्यात केले.


विप्ला फाउंडेशन आणि एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट प्रा.दिपक जाधव यांनी सांगितले की, सामान्य, गोरगरीब नागरिकांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी पुरावा नसतो. काही वेळा अज्ञानामुळे बऱ्याचवेळा कागदपत्रे नसल्यामुळे शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. कागदपत्राची पूर्तता करून शासकीय शुल्क भरून आपले प्राथमिक कसे मिळवायचे याचे संपूर्ण मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून आम्ही देत असतो. प्रत्येक वस्तीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले पाहिजे. संस्थेच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरातील ६०० हुन अधिक युवती आणि महिलांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे.


एचएसबीसी टेक्नॉलॉजिस्ट पार्थ कलाळ म्हणाले की, सध्याचा काळ हा मार्केटिंग आणि कम्युनिकेशनचा आहे.१८ ते ३० वयोगटातील किमान दहावी पास आणि पदवीधर युवती महिलांना व्यावसायिक संगणक प्रशिक्षण (सॉफ्ट स्किल) आपण देत असतो. त्यामुळे किमान उत्पन्नाच्या नोकऱ्या उपलब्ध होतात. पारंपरिक शिक्षणाला सॉफ्ट स्किलची जोड देऊन मार्केट मध्ये रिटेल, कॉलिंग, डाटा एन्ट्री, वर्ड-एक्सेल, पीपीटी, इमेलिंग, बिलिंग, ऑर्डर बुकिंग, प्रॉडक्ट प्रेझेन्टेशन, ग्राफिक इ विविध ठिकाणी नोकऱ्या उलब्ध होत आहेत. त्यासाठी ४५ दिवसांच्या ट्रेनिंग कार्यक्रमात सहभागी व्हावे.


सर्वसामान्य नागरिकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत. त्याची माहिती बऱ्याच गरजू लोकांना माहीत नसते. महायोजना शिबिराच्या माध्यमातून विविध योजना एकाच छाताखाली दिल्या जात आहे. प्रशिक्षक गायत्री दीक्षित म्हणाल्या की, आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, आम्हाला कॉम्पुटर कसा समजणार नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. अँड्रॉइड मोबाईल आता तुमच्या हातात आहे. आम्ही संगणकावर मूलभूत माहिती अतिशय सोप्या पद्धतीने शिकवतो. एका आठवड्यात की बोर्डचे फंक्शन समजते. संगणक साक्षरता आता अवघड राहिलेली नाही.


प्रियंका चांदणे, कोमल हातागळे, कोमल जाधव, नीता हिवाळे, मोनिका डोंगरे, योगीता सोनवणे, दिक्षा गायकवाड, आकांक्षा गायकवाड, अंबिका विटकर, अश्विनी साळवे, वैष्णवी गायकवाड, सायली धावरे, अश्विनी डोंगरे, रेश्मा देवकर, हर्षदा जाधव या प्रशिक्षण घेतलेल्या युवती आणि महिलांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वैशाली गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन नितीन हटागळे, महेंद्र सरोदे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा