Breaking


जुन्नर तालुक्यातील विकास कामांसाठी भरघोस निधी - आमदार अतुल बेनके


जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर शहरातील श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिवनेरी किल्ला रस्ता ( जुन्नर - वडज - कुसुर रस्ता) या रस्त्यावरील फुटपाथ व गटार काम करणे या ०२ कोटी २६ लक्ष रुपयांच्या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम आमदार अतुल बेनके यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.


या कार्यक्रमप्रसंगी आमदार अतुल बेनके यांनी जुन्नर शहरात व तालुक्यातील सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांची माहिती उपस्थितांना दिली. 

रस्ते, पाणी, वीज, आरोग्य यांसह विविध विभागांच्या माध्यमातून भरघोस निधी उपमुख्यमंत्री अजित पवार व दिलीप वळसे पाटील यांच्या सहकार्याने आपल्याला प्राप्त झाल्याचेही बेनके म्हणाले.

जुन्नर शहराच्या दृष्टीने महत्वाचे प्रोजेक्ट्स म्हणजे शिवसंस्कार सृष्टी साठी २३ कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला याची आठवण याप्रसंगी उपस्थित जुन्नरकरांना करून दिली

शिवनेरी किल्ला रोपवे प्रोजेक्ट यासारखे विविध प्रकल्प डोळ्यासमोर ठेवून आपण वाटचाल करत आहोत. भविष्यातील सर्व नियोजित प्रकल्प व कामे पूर्ण करण्यासाठी जुन्नरकरांची साथ महत्वाची आहे असे मत यावेळी आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले. 

या कार्यक्रम प्रसंगी जुन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पापा खोत, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते फिरोज पठाण, भाऊसाहेब देवाडे, अरुण पारखे, नगरसेवक भाऊ कुंभार, सुनील ढोबळे, अक्षय मांडवे, अलकाताई फुलपगार, मोनाली म्हस्के, आश्विनी गवळी, हाजरा इनामदार, बारवचे सरपंच संतोष केदारी, कुसुरचे सरपंच दत्तात्रय कोकणे, अझिमभाई तिरंदाज, उज्वलाताई शेवाळे, आरतीताई ढोबळे, बाळासाहेब सदाकाळ, भूषण ताथेड आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा