Breaking


"या" आमदाराचे सोशल मीडिया अकाउंट हॅक

Fb : Amol Mitkari


मुंबई, ता.८ : विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. या प्रकरणी सायबर सेल कडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे, या संबंधीची माहिती आमदार मिटकरी यांनी ट्विटर वरून दिली आहे.  मिटकरी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, "माझे इंस्टाग्राम अकाउंट अज्ञात व्यक्तीकडून हॅक केल्या गेले असून त्याबाबत सायबर सेल व सिव्हील लाईन पोलीस स्टेशन अकोला येथे मी रीतसर गुन्हा दाखल केला आहे. अकोला पोलीस पुढील तपास करत असून इंस्टाग्रामवर येणाऱ्या पोस्ट अधिकृत समजु नये व कोणीही त्याला उत्तर देऊ नये". असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा