Breaking


आमदार निकोले यांचा दणका; जिल्हाधिकारी यांनी घेतला धसका


डहाणू : दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात होऊ घातलेल्या विविध प्रकल्पांमध्ये आदिवासीं बरोबर होत असलेल्या गैरव्यवहारा बाबत पालकमंत्री यांच्या परवानगीने सर्वांचे लक्ष वेधून माकप आमदार कॉ. विनोद निकोले यांनी वाचा फोडली होती.


यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, केंद्र सरकार कडून बुलेट ट्रेन, मुंबई - बडोदा हायवे असे विविध प्रकल्पांसाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर पालघर जिल्ह्यातील विशेषतः डहाणू व तलासरी मधील गोरगरीब आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. तसेच या प्रकल्पांमध्ये गेलेल्या जागांपैकी अधिकतर जागेचे मूळ मालक हे मुंबई, सुरत अहमदाबाद अश्या ठिकाणी राहत पण, त्या जमिनीवर गेल्या 50 - 60 वर्षांपासून येथील आदिवासींच्या ताब्यात आहेत. पण, महसूल च्या कोणत्याही 7/12 वर त्यांची कुठेही नोंद नाही. तसेच ज्यावेळी लाभार्थींना शासनाकडून मोबदला दिला जाईल. त्यावेळी येथील जागेच्या कब्जेदारांना सुद्धा विचारात घेतले पाहिजे कारण, तेथील गोरगरीब शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचे शेती शिवाय  दुसरे कोणतेही साधन नाही. तसेच ज्यावेळी हा शेतकरी प्रांत कार्यालयात आपल्या कागदपत्रकांची पडताळणी करण्यासाठी जातो त्यावेळी त्या शेतकऱ्याला कागपत्रकांची चाळणी लावून कार्यालया बाहेर काढले जाते ती अतिशय खेदजनक बाब आहे. आणि तोच शेतकरी जेव्हा एखाद्या दलाल मार्फत कार्यालयात जातो तेव्हा त्याला सरळ हाताने सर्व दस्तावेज मिळतात. आणि त्या शेतकऱ्याला मिळणाऱ्या 100 % मोबदल्यापैकी 75 % मोबदला दलाल घेऊन जातो. असा लक्षवेधी मुद्दा माकप आमदार विनोद निकोले यांनी जोरदार पणे उपस्थित केला होता.

त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी घेतली असून त्यांनी जा. क्र. पुनर्वसन / एनएचएसआरसीएल / आदेश / टे-2 / कावि-523 / 2021 दि. 24/11/2021 रोजी सुधारित आदेशान्वये अपर निवासी उपजिल्हाधिकारी पालघर सुरेंद्र नवले यांची डहाणू करीता तर उप विभागीय जिल्हाधिकारी तलासरी यांची तलासरी करीता भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा