Breakingमुंबईच्या आझाद मैदानात ५० हजार शेतकऱ्यांची महापंचायत संपन्नमुंबई, ता.२८ : लखीमपूर खेरी येथे गाडी खाली चिरडलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थिकलश यात्रा महाराष्ट्रात ऑक्टोबर मध्ये पुण्यातून काढण्यात आली होती आज रविवारी मुंबई मध्ये या अस्थिकलश यात्रेचा समारोप करण्यात आला. तसेच, मुंबईच्या आझाद मैदानात भव्य किसान मजदूर महापंचायत, शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक विजयाचा जयजयकार आणि उर्वरित मागण्यांसाठी लढण्याची शपथ घेण्यात आली.


महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज रविवारी मुंबईतील आझाद मैदानावर ५० हजार  लोकांची राज्यव्यापी किसान मजदूर महापंचायत आयोजित करण्यात आली होती. या महापंचायतीला महाराष्ट्रभरातील शेतकरी, कामगार, शेतमजूर, महिला, तरुण आणि सर्व धर्म, जातीचे विद्यार्थी यांनी मोठी गर्दी केली होती.तीन कृषी कायदा रद्द करण्यासाठी वर्षभर चाललेल्या शेतकऱ्यांच्या संघर्षाच्या भाजप सरकारवर ऐतिहासिक विजय साजरा करण्यात आला. तसेच उर्वरित मागण्यांसाठी लढण्याचा आपला निर्धारही जाहीर करण्यात आला. यात न्याय्य MSP आणि खरेदीची हमी देणारा केंद्रीय कायदा, वीज दुरुस्ती विधेयक मागे घेणे, लखीमपूर खेरीच्या आरोपी अजय मिश्रा टेनीची अटक, चार कामगार संहिता रद्द करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.


आगामी सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि महाराष्ट्रातील येत्या राज्यव्यापी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करण्याचे आवाहनही या महापंचायतीने केले आहे.महापंचायतीला एसकेएम नेते राकेश टिकैत, डॉ दर्शन पाल, हन्नान मोल्ला, युधवीर सिंग, तजिंदर सिंग विर्क, अतुल कुमार अंजान, राजाराम सिंग, योगेंद्र यादव, जसबीर कौर नट, आशिष मित्तल, डॉ अशोक ढवळे, बी व्यंकट, मेधा पाटकर यांनी संबोधित केले. जयंत पाटील, प्रतिभा शिंदे, नरसय्या आडम, जे.पी.गावित, डॉ.अजित नवले व इतर शेतकरी, कामगार नेते उपस्थित होते.


लखीमपूर खेरी शहीदांच्या अस्थिकलश यात्रा २७ ऑक्टोबर रोजी पुण्यातून सुरुवात केली, गेल्या महिनाभरात महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत फिरून छत्रपती शिवरायांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी, शहीद बाबूंच्या स्मारकाला भेट दिली.


आज सकाळी शहीद कलश यात्रेने १९५० च्या संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील १०६ हुतात्म्यांचे स्मरण करणाऱ्या हुतात्मा चौकाला भेट दिली. आझाद मैदानावर महापंचायत झाल्यानंतर गेट वे ऑफ इंडियाजवळील अरबी समुद्रात दुपारी चार वाजता एका विशेष कार्यक्रमात हुतात्म्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा