Breaking


शहीद अस्थिकलश यात्रा बोईसर शहरामध्ये मध्ये दाखल


बोईसर : आज दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी बोईसर MIDC शहीद भगतसिंग चौक येथे लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या हिंसाचारात हुतात्मा झालेल्या शेतकर्‍यांच्या अस्थि घेऊन देशभर सुरु असलेली शहीद अस्थिकलश यात्रा बोईसर शहरात  संध्याकाळी ६.३० वाजता दाखल झाली. 


यावेळी अखिल भारतीय किसान सभा पालघर तालुक्याच्या वतीने शहीद शेतकर्‍यांना श्रद्भांजली वाहुन शेतकरी विरोधी भाजप सरकारच्या विरोधात घोषणा देवून उपस्थित शेतकरी-कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. तर हिंसेचा धिक्कार करीत दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या 650 हून अधिक शेतकर्‍यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी किसान सभा तालुका सचिव काॅ.सुनिल सुर्वे, काॅ.मधुकर डवला, काॅ.हर्दल लोखंडे, काॅ.हरेश वावरे, काॅ.विलास भुयाळ, काॅ.भगवान लहांगे, काॅ.जाॅन, काॅ.महेश धोडी, काॅ.संतोष कामडी, काॅ.अनंता सांबरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा