Breaking


मावळ : वडेश्वर ग्रामपंचायत मध्ये महामानव बिरसा मुंडा जयंती साजरी !


मावळ : वडेश्वर ग्रामपंचायत मध्ये महामानव बिरसा मुंडा व आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 


यावेळी माळी म्हणाले, पेसा कायदा व वनहक्क कायदा हे आदिवासी समाजासाठी वरदान ठरले आहेत. आदिवासी समाजातील बांधवांनी पेसा कायदा चा आधार घेऊन या पुढे आपले हक्क मिळवले पाहिजेत. वनहक्क कायदा मुळे आदिवासी सामुहिक दावे मंजूर करून फाँरेस्ट वर अधिकार गाजवता येणार आहे या पुढे फाँरेट चे आधिकारी हे वनहक्क कायदा मुळे आदिवासी लोकांना त्रास देऊ शकत नाही.  

ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे म्हणाले, आता आदिवासी लोक जागृत होत आहेत गावागावात आदिवासी क्रांतीकारक जयंती साजरी होत आहेत. आपले प्रश्न सोडविण्यासाठी आदिवासी लोक संघटीत होत आहेत आता या पुढे आदिवासी संघटना चांगल्या पद्धतीने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आपण एकत्र येऊ या आणि समाजासाठी खारीचा वाटा म्हणून काम करूया. 

यावेळी वडेश्वर माजी सरपंच छाया हेमाडे, घोडेगाव प्रकल्प कार्यालय माळी, उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, खांडी सरपंच अंनता पावशे, वडेश्वर गावचे पोलिस पाटील अंकुश मोरमारे, ग्रामपंचायत सदस्य दत्ता चिमटे, सुरेखा शिंदे, हेमांगी खांडभोर, ग्रामसेवक कासारकर, बाळू मोरे, अमित हिले, गणेश लोटे, मनोहर हिले, संजय हेमाडे, शिवाजी हेमाडे, वसुदेव तनपुरे, खंडू शिंदे, नितीन हिले आदी नागरिक उपस्थित होते. छाया हेमाडे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा