Breaking







आदिवासी संशोधन आणि विकास संस्थेची बैठक आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

 


गोंडवाना संग्रहालयाचा उत्तम आराखडा तयार करा - ॲड.के.सी.पाडवी


पुणे / आनंद कांबळे : आदिवासी समाजातील कला, परंपरा व संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी नागपूर येथे १०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या गोंडवाना संग्रहालयाचा सविस्तर आणि उत्तम आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिले.


आदिवासी संशोधन आणि विकास संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस संस्थेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड, सहसंचालक जान्हवी कुमरे, जात पडताळणी सहआयुक्त आर.आर.सोनकवडे, संशोधन अधिकारी श्यामकांत दौंडकर, हंसध्वज सोनवणे आदी उपस्थित होते.



गोंडवाना म्युझिअमच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या कला व संस्कृतीचे समुचीत दर्शन घडेल असा आराखडा तयार करावा असेही ॲड.पाडवी म्हणाले. त्यांनी जातपडताणी समितीच्या कामकाजाची व ऑनलाईन सुविधेची माहिती  घेतली. तत्पर्वूी त्यांनी संस्थेच्या इमारतीतील संग्रहालयाची पाहणी केली.


आयुक्त डॉ.भारूड यांनी सादरीकरणाद्वारे संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा