Breaking

बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर मुंबईत बैठकबोनस आणि एक लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी


मुंबई दि. १२ : बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे लाभ तातडीने मिळत नाहीत त्यास  कालावधी लागतो म्हणून ऑनलाइन पद्धतीने तपासण्यात येणार्‍या अर्ज लवकरात लवकर तपासून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि कामगार वर्गांना लाभ लवकरात लवकर द्यावा अशी मागणी  राज्यातील संघटनांनी केली, त्यावर ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चू. श्रीरंगम यानी दिले.


मुंबई येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळांमध्ये महाराष्ट्र राज्यातील संघटना यांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,  उपाध्यक्ष राजेश माने, सालिम शेख, उमेश ड़ोर्ले, बालाजी इंगले आदिसह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी काशिनाथ नखाते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत  सकारात्मक असुन त्यानुसार प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीला पाठवण्यात आलेले आहे, दिवाळी झाली तरी तो लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. कोरोना कालावधीमध्ये ज्या कामगारांचा मृत्यू झाला आहे, अशा कुटुंबीयांना एक लाख रुपये देण्यात यावे अशी मागणी आणि पत्रही देण्यात आले. कोरोना कालावधीमध्ये अनेक कामगारांचे बँक खाते बंद पडले त्याचबरोबर बँकांचे विलीनीकरण झाल्यामुळे बँक खाते बदलले अनेक  कामगारांना वेगवेगळे लाभ मिळत नाहीत त्यामुळे  नवीन बँकांची माहिती संकलित करून त्यांनाही लाभ देण्यात यावा, यासाठी संगणकांमध्ये आवश्यक तो बदल करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


ऑनलाइन पद्धतीची अर्जाची तपासणी लवकर होत नसल्यामुळे इतर लाभ मिळत नाहीत आणि बऱ्याच वेळा ते रद्द केले जात आहेत हे न करता कामगारांना संधी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तपासणीसाठी अनेक वेळा कालावधी लागतो याचाही विचार करावा अशी मागणी करण्यात आली. या सर्व त्रुटी दूर करून लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन श्रीरंगम यानी दिले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा