Breaking
पिंपरी मध्ये माझे संविधान निबंध स्पर्धा संपन्नपिंपरी, ता. २६ : प्रज्ञा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक, माध्यमिक विद्यालय थेरगाव येथे "माझे संविधान माझा अभिमान" निमित्त विद्यार्थ्यांच्या संविधान पाठांतर स्पर्धा घेण्यात अाल्या. प्रथम घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात अाला. 

 

प्राथमिक विभागाची (इ. १ ते ७ वी) स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. माध्यमिक विभागाची (८वी ते १०वी ) स्पर्धा शाळेत घेण्यात आली. संविधान पाठांतर स्पर्धेमध्ये १ ते ७ वी मधून प्रथम क्र. दिव्या देवकर, निलकंठ जगदणे, द्वितीय क्र. बुसरा सनदी, रुतुजा खराटे, तृतीय क्र.अजय बहादुर, माध्यमिक विभागात प्रथम क्र. पुजा जाधव, द्वितीय क्र.अनिरूध्द गवळी, तृतीय क्र.दिक्षा जगधने यांनी बक्षिस मिळविले.


कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, सुत्रसंचलन सुप्रिया तावरे यांनी केले. स्पर्धचे परिक्षण बालविभाग प्रमुख पुजा खरात, प्राथमिक विभागाच्या संगिता भालके, स्विटी कांबळे यांनी केले.


सावित्री माई ज्योतिबा फुले बालवाडी प्रशिक्षण वर्गाच्या विद्यार्थिनी पुजा किंदर हिने संविधान वाचन केले. धम्मपाली ढोबळे व प्रज्ञा कांबळे यांनी संविधान विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका भारती गवळी मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे, संगिता रोकडे, वैशाली कायापाक उपस्थिती होते. आभार कोमल जाधव यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा