Breaking


राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त असाणे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजनआसने : आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे आणि क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी क्रांती संघटना, असाणे यांच्या मार्फत असाणे गावात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


त्यावेळी सर्वांना मास्कचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या आरोग्य शिबिरास सुरुवात झाली त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, अडिवरे येथील डॉ. शिवांजली कारंडे, पुष्पा भंडलकर (आरोग्य सेविका, असाणे), गोविंद भारमळ (आरोग्य सेवक), वंदना तळपे (गटप्रवर्तक), एन. एम. झोडगे (ग्रामसेवक) यांनी उपस्थित किशोरवयीन मुली आणि महिलांना आरोग्यविषयक कोणत्या समस्या उदभवू शकतात, त्यावर काय उपाय केले पहिजेत, कशी काळजी घेतली पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करून शंकांचे निरसन केले. या धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्याकडेही लक्ष दिले पाहिजे. आजार झाल्यानंतर खर्च करण्यापेक्षा आजार होणारच नाही यांवर कसे लक्ष द्यावे याबद्दल मार्गदर्शन करून उपस्थित महिला आणि पुरुष यांच्याकडून योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.


तसेच, ज्या ग्रामस्थांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठी कोविड १९ च्या लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. उपस्थित महिलांना सॅनिटरी पॅडचेही वाटप करण्यात आले. "मुलगी वाचवा मुलगी शिकवा" आणि कोविडच्या काळात कोणती खबरदारी घ्यावी असे महत्वपूर्ण सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरल्या होत्या.


कार्यक्रमास उपस्थित महिलावर्ग, पुरुषवर्ग, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, आदिवासी क्रांती संघटनेचे सदस्य, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, सल्लागार समितीतील सदस्य, नर्स, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ आणि तरुणवर्ग यांचे विशेष आभार मानून सर्वांच्या अल्पोपहाराची सोय करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी क्रांती संघटना असाणे, ग्रामपंचायत असाणे आणि समस्त ग्रामस्थ असाणे, सर्व नोकरदार, व्यावसायिक, पुणेकर, मुंबईकर आणि इतरत्र ठिकाणी स्थायिक झालेले ग्रामस्थ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते, अशी माहिती आदिवासी क्रांती संघटनेचे अध्यक्ष सागर ठुबल यांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा