Breaking


पंकजा मुंडे यांनी घेतले चांदवडच्या रेणुकादेवी मातेचे दर्शनचांदवड, ता.२ (सुनिल सोनवणे) : आज चांदवड येथे रेणुका देवी मंदिर येथे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मातेचे दर्शन घेतले. भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मंदिर परिसरात स्वागतास थांबलेले होते. पंकजा यांचे आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले.


यावेळी रेणुका देवी मंदिर ट्रस्ट तर्फे सुभाष पवार यांनी सत्कार केला. रेणुका माता हे आमच्या कुटुंबाचे दैवत आहे आज मातेच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले आहे. मी आणि मुंडे साहेब सात वर्षांपूर्वी चांदवड येथील कार्यक्रमास आलो असताना मुंडे साहेबांच्या बरोबरच मातेच्या दर्शनासाठी आलो होतो, याच्या आठवणी मुंडे यांनी केली.


यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरे दिली

● ईश्वराला काय साकडे घातले? महाराष्ट्रामध्ये स्त्री म्हणून जन्म झाला आहे म्हणून स्त्रियांसाठी व वंचितांसाठी योगदान देता यावे आणि त्यांच्या भल्यासाठी काम करण्याची शक्ती देवो.

● आघाडी सरकार जाऊन भाजप सरकार यावे असे साकडे घातले का? मी देवाला असे साकडे घालत नाही व वैयक्तिक गोष्टी सांगत नाही.

● अनिल देशमुख यांच्याबद्दल .... तो एक प्रक्रियेचा भाग आहे असे सांगून बोलण्याचे टाळले. रेणुका मातेच्या गर्भाशयात बसलेले असताना राजकारण नको कोणी कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही पदावर असो त्यांनी जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे

● वाढती महागाई पेट्रोल डिझेल वर बोलताना जनतेच्या त्रासाला कमी करण्याची ईश्वरचरणी प्रार्थना केली असल्याचे सांगितले.


यावेळी भाजप नेते आमदार जयकुमार रावल, केदानाना आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, निवृत्ती घुले, अशोक व्यवहारे, महेंद्र कर्डीले, विनोद सोनवणे, महेश बोराडे, सुनील डुंगरवाल, नितीन फंगाळ, राजेंद्र गांगुर्डे, महेश बोराडे, अंकुर कासलीवाल, महेश खंदारे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा