Breaking


पिंपरी चिंचवड : गणेश मंदिरात दिवाळी पहाट संपन्न


पिंपरी चिंचवड : फुलेनगर (चिंचवड) ताल निनाद संगीत विद्यालय आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने फुलेनगर, कृष्णनगर येथील अभिजात संगीत रसिकांसाठी धनत्रयोदशी पूर्वसंध्येला संगीत कलाविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


गत काही वर्षात तरुणांमध्ये संगीत, गायन-वादन शिकण्याचे वेड वाढले आहे, दिवाळी पहाट ही सांगितिक सप्तसुरांनी रंगतदार ठरते आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांची रेलचेल करण्याकरिता लोकनेत्यांपासून अनेक सामाजिक संस्था, उद्योजक, सेलिब्रेटीही पुढाकार घेत आहेत. 


पुण्यासह बहुतांश सर्व शहरांतून विविध गायकांच्या गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेत दिवाळीची सुरुवात होते. संगीतकार सचिन शिंगाडे यांनी दिवाळी पहाट, पाडवा पहाट, भाऊबीज यातील सांस्कृतिक आशय सांगणारे संगीत अविष्कार सादर केले.


पिंपरी चिंचवड शहरात अभिजात संगीताचे सादरीकरण करोनामुळे स्थगित करण्यात आले होते. आता ही परंपरा पुढे सुरू ठेऊ, असे संयोजक शिवानंद चौगुले यांनी सांगितले. या कार्यक्रमास नगरसेविका योगिता नागरगोजे, सचिन सानप, बाबा देसाई, यशवंत कान्हेरे, प्रा.मिलिंद ढोबळे आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा