Breaking
पुणे : अपंगांच्या प्रश्नासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेत नामदार बच्चु कडू यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न


पुणे : नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील अपंगाच्या प्रश्नासदर्भात बैठक पुणे जिल्हा परिषदेत संपन्न झाली.


जिल्हा परिषद 5 टक्के दिव्यांग निधी संपूर्ण दिव्यांगाच्या वैयक्तिक योजनावर खर्च करावा, या मागणीसाठी पुणे जिल्हा परिषद समोर प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांग आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दखल घेऊन पुणे जिल्हा परिषदेने सोमवारी संघटनेसोबत मीटिंग लावली होती. या बैठकीस राज्यमंत्री बच्चु कडू हे उपस्थित होते.

तसेच बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरघंटीवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, सदस्य आशाताई बुचके, बांधकाम सभापती काकडे, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव, महिला अध्यक्ष सुरेखाताई ढवळे, सुभाष  दिवेकर, शरद दिवेकर, समीर तावरे, विजय पगडे, शेखर मंडलिक, नंदू राऊत आदीसह उपस्थित होते.

बैठकीस राज्यमंत्री बच्चु कडू यांनी DDRC इमारती बांधकामासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च न करता दीड कोटी रुपये खर्च करा अशा सूचना दिल्या. दोन कोटी रुपये दिव्यांगाच्या व्यैयक्तिक लाभाच्या योजनेवर खर्च करा, जिल्ह्यामधील ज्या ग्रामपंचायती 5 टक्के निधी खर्च करत नसेल ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशाही सूचना दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा