Breaking
पुणे : जुन्नर मध्ये अभाविपच्या जनजाती गौरव यात्रेची उत्साहात सांगता !


जुन्नर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने काढण्यात आलेल्या जनजाती गौरव यात्रेची सांगता प्रेक्षागृह शंकरराव बुट्टे पाटील महाविद्यालयात  झाली. जुन्नर मध्ये या यात्रेचे नागरिकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेची सुरुवात पिंपरी चिंचवड पासून झाली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते यात्रेचे उदघाटन झाले.


जनजाती समाज्याचा उत्कर्ष व जनजाती क्रांतिकारक यांचा गौरव तसेच अडगळीत पडलेल्या समाज्याला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा पूर्ण पुणे विभागात फिरली. जनजाती समाज हा शिक्षणापासून वंचित आहे. जनजाती संस्कृती ज्या ज्या वीरांनी या देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले आहे. त्या वीरांना या यात्रेच्या निमित्ताने समाज्यात पोहचविणे. या यात्रेच्या माध्यमातून समानतेची भावना जनजाती आदिवासी समाज्यात यावी. यासाठी ही यात्रा काढण्यात आली. ७ तालुक्यांचा प्रवास करून रात्री ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर या पवित्र भूमीत मध्ये आली. सर्व समाज, संघपरिवार यांच्या वतीने या यात्रेचे स्वागत करण्यात आले.


या वेळी अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.प्रशांत साठे यांनी उपस्थित सर्वांना संबोधित केले. देशामध्ये जनजाती समाज्याच्या उत्कर्षासाठी होणारे प्रयत्न त्यांनी सांगितले. या वेळी सौरभ शिंगाडे पुणे विभाग संयोजक, रोहित राऊत पुणे विभाग संघटनमंत्री व रागिणी सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. अभाविपच्या या उपक्रमाचे समाज्याच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ही यात्रा पुणे जिल्ह्यातील ७ जनजाती तालुक्यांचा, १०० पेक्षा ज्यास्त पाड्याच्या वर ही यात्रा पोहचली. या यात्रेच्या माध्यमातून सुमारे १०३३ किलोमीटरचा प्रवास या यात्रेने केला.

या समारोपाच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन जुन्नर शाखेच्या वतीने करण्यात आले. या वेळी अभाविप उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष  प्रा.मनोहर चव्हाण, आकाश गाडे, रवींद्र डोंगरे , प्रणिती भवाळकर, रागिणी सूर्यवंशी, गणेश पाडेकर,  सौरभ जाधव, काजल बनकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रतीक्षा ताजणे हीने केले. शेवटी आभार चव्हाण सर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा