Breaking


पुरंदर : राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेची तालुका कार्यकारणी जाहीर !


पुरंदर : आज दिनांक १३ नोव्हेंबर २०२१ रोजी पुरंदर येथे राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेची बैठक संपन्न झाली. या बैठकीत उशिरा होणारे वेतन, सेवाप्रवेश नियम, प्रमोशन इत्यादी  विषयावर चर्चा करण्यात आली.


तसेच तालुका कार्यकारणी निवड संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष प्रवीण भरड व जिल्हा अध्यक्ष सचिन राखुडे, सचिव दीपक राऊत, मेजर जालिंदर साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच. बारामतीचे कार्याध्यक्ष पुष्पराज निंबाळकर, व  दत्ता ननावरे, आणि अतुल कांबळे, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

तालुका अध्यक्षपदी भास्कर कारकुड, उपाध्यक्षपदी दीपक शेलार, कार्याध्यक्षपदी प्रशांत रासकर, सचिवपदी पोपट गोडसे, संघटकपदी आंनद अडसूळ, सह संघटकपदी वीरेंद्र धर्माधिकारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा