Breaking


आकुर्डीमध्ये मोराचे दुर्मिळ दर्शन, अन्न पाण्याच्या शोधात आल्याचा अंदाजपिंपरी चिंचवड, ता.१४ : आकुर्डीतीतील जैन कन्स्ट्रक्शनच्या बांधकाम साईटच्या एका मोठ्या खोदलेल्या खड्ड्यामधील तळ्यात आज सकाळी नागरिकांना मोराचे दुर्लभ दर्शन झाले. मोराने या ठिकाणी नागरिकांनी दिलेल्या खाद्याचा आस्वाद घेतला. मानवी वस्तीमध्ये मोर आल्याने नागरिकांनी अनेक फोटो काढून त्याचा चांगलाच आनंद घेतला.


मावळ खोऱ्यातील जंगलझाडी मध्ये मोर पाहायला मिळतात. कदाचित स्थलांतर करताना देहूगाव मार्गे दुर्गादेवी टेकडी येथे हा मोर वाट चुकून अन्न पाण्याच्या शोधत आकुर्डीत आला असावा. आकुर्डीतील ऍड.रमेश महाजन यांनी त्यांच्या घरातून  या मोराचे घेतलेले छायाचित्र अतिशय मनमोहक आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा