Breaking


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भारतीय ट्रायबल पार्टीने दिला पाठींबाअकोले, ता. ११ : एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलगीकरण करावे या मागणीसाठी राज्यात एसटी कर्मचारी संपावर आहेत. या संपाला विविध पक्ष, संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आता या संपाला भारतीय ट्रायबल पार्टीने ही पाठिंबा दिला आहे.


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले बस आगारात एसटी कर्मचारी यांना शासकीय भत्ते व लाभ इतर शासकीय कर्मचारी यांच्या प्रमाणेच मिळावे व एसटी महामंडळाचे विलणीकरण हे राज्य शासनात करण्यात यावे यासह इतर मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील सर्व कर्मचारी वाहक व चालक हे संपावर आपल्या मागण्या ठामपणे मांडून आहेत, आज अकोले बस आगार या ठिकाणी भारतीय ट्रायबल पार्टीच्या अहमदनगर जिल्हा प्रभारी डॉली डगळे, अकोले शहर महिला अध्यक्षा चित्रा धोंगडे, अकोले तालुका महिला संघटक माधुरी डगळे यांनी एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या संपास पाठिंबा दिला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा