Breaking

आदिवासी आधार मैत्री फाउंडेशन नाशिक जिल्हा यांची सहविचार सभा संपन्नसुरगाणा (दौलत चौधरी) : आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन नाशिक जिल्ह्याच्या वतीने विविध विषयांवर चर्चा सत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमामध्ये उपस्थित सदस्यांनी आपापली ओळख करून देत आदिवासी समाजातील समस्या मांडल्या, त्यावर उपाययोजना सांगितल्या. तसेच आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन कडून काय करता येईल यावर चर्चा करण्यात आली.


आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशनचे ग्रामीण भागातील गाव पातळीवर काम करण्यासाठी  तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये दोन, चार सदस्य असावेत यासाठी सदस्य नोंदणीची ऑनलाइन लिंकचे फाऊंडेशन अध्यक्ष रतन धुम यांच्या हस्ते लिंकचे अनावरण करून एका सदस्याची नोंदणी करून घेण्यात आली.यावेळी अध्यक्ष रतन धूम यांच्या मनोगतात परिचयांच्या वेळेस आलेल्या प्रत्येक मुद्यांपैकी, प्राथमिक शिक्षण या विषयावरती भर देणे गरजेचे आहे त्यावरती उपाययोजना सांगितल्या, स्पर्धा परीक्षेस प्राप्त विद्यार्थी निवडुन त्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे नियोजन केले. आदिवासी संस्कृती, चालीरीती, रुढीपरंपरा जतन संवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात आले. आदिवासी भागात होत असलेले धर्मांतर व आदिवासी समाजावर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी उपाय योजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली.


आदिवासी आधार मैत्री फाऊंडेशन मित्र परिवार यांच्याकडून सुरगाणा तालुक्यातील १५ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम ८ नोव्हेंबर रोजी पळसन विभाग व उंबरठाण विभाग ९ नोव्हेंबर रोजी ठाणापाडा व सुरगाणा येथील कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाच्या शेवटी खजिनदार मनोहर गांगुर्डे यांनी या सहविचार सभेस सर्व कार्यकारणी व सदस्य उपस्थित असल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच प्रा. भागवत महाले यांनी सहविचार सभेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा