Breaking


भोर येथे सातवे फुले, शाहू, आंबेडकर विचार साहित्य संमेलनपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ भोर, अनंतराव थोपटे महाविद्यालय, भोर, महाराष्ट्र साहित्य परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा भोर, शुभांगद गोरेगावकर मेमोरियल हॉस्पिटल भोर यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वे शाहू फुले आंबेडकर विचार प्रसार साहित्य संमेलन दि.२१ नोव्हेंबर २०२१ (रविवार) रोजी अनंतराव थोपटे महाविद्यालय सभागृह येथे आयोजित करण्यात आले आहे.


या संमेलनाचे उद्घाटन लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर, यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जेष्ठ साहित्यिक हरी नरके संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे आर.के.गायकवाड, ब्रिगेडियर असणार आहेत.


स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी एका पत्रकाद्वारे कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, एकूण दोन सत्रामध्ये परिसंवाद आणि पुरस्कार आयोजित केलेले आहेत. परिसंवाद स्वातंत्र्य ७५ वर्षातील आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातील तृतीय पंथीय समाजातील चळवळीतील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या परिसंवादात डॉ.मिलिंद कसबे, डॉ.भारत भालेराव सहभाग घेणार आहेत.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव पुरस्कार रोख रक्कम २५ हजार आणि सन्मान चिन्ह गौरी सावंत यांना प्रदान करण्यात येणार आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार, सन्मान चिन्ह प्रा.कल्पना रोकडे सह शंकरराव जगताप, विनय साळवे, सुनंदा गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा