Breaking

आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या जयंती निमित्त राज्यव्यापी आदिवासी सांस्कृतिक महोत्सव इगतपुरी सोनोशीत होणार !


इगतपुरी : आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे व धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंतिनिमित्त राघोजी भांगरे व इंग्रजांविरुद्ध बंड करणारे बंडकऱ्यांचे निवासस्थान सोनोशी ता. इगतपुरी जि.नाशिक येथील उंच डोंगरावर घनदाट जंगलात बाडगीची माची प्रसिद्ध आहे. या ऐतिहासिक पावन स्थळाच्या जवळ सोनोशी गावात या स्थळाला उजाळा देण्यासाठी रविवारी दि.14 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता बिरसा ब्रिगेड सह्याद्री व सातपुडा या संघटनेच्या वतीने  आदिवासी सांस्कृतिक महोत्सव या राज्यव्यापी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदारशरद पवार, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, बिरसा ब्रिगेड संस्थापक सतीश पेंदाम, आदिवासी मंत्री के.सी पाडवी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, बिजमाता-राहीबाई पोपेरे, वनराज्यमंत्री दत्ता भरणे ,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तर विशेष अतिथि प. बंगालचे वनमंत्री बिरबाहा हांसदा तसेच खासदार हेमंत गोडसे, डॉ. अमोल कोल्हे, इगतपुरीचे माणिकराव कोकाटे,तसेच डॉ.किरण लहामटे-आमदार अकोले विधानसभा, दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, सुनील भुसारा, नितीन पवार, राजेश पाटील, दौलत दरोडा, सुनील शेळके, वरील सर्व विधानसभा सदस्य आपल्या तालुक्यातून सोनोशी येथे उपस्थित राहणार आहेत.

आद्यक्रांतिकरक राघोजी भांगरे यांचे पाच एकरात उभ्या राहणाऱ्या भव्य स्मारकाचे उदघाटन शरद पवार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरीही या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्यातुन मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर मधून प्रत्येकी पाच सांस्कृतिक पथके व प्रत्येक आदिवासी गावातून  बाडगीची माची / सोनोशी येथे जाण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व आदिवासी समाज,सर्व संघटना पदाधिकारी, तरुण मंडळी, महिलांनी जिह्यातून उपस्थित रहावे, असे आवाहन बिरसा ब्रिगेड सह्याद्रीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा