Breaking


डीवायएफआय कडून पूर्णेत नगरविकास मंत्र्यांना निवेदनपूर्णा, ता.१५ : पूर्णा येथे डॉ. बाबाबसाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन व विविध विकासकामांच्या उद्घाटना निमित्ताने राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पूर्णेत आले असतांना त्यांना डीवायएफआय कडून पूर्णेतील विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


पूर्णेत मागील अनेक वर्षे कायमस्वरूपी मुख्याधिकारी (CO) नाहीत, SFI-DYFI या संघटनांकडून मागील तीन-साडेतीन वर्षांपासून जिल्हाधिकाऱ्यांना सतत मागणी करूनही मागणी सोडविली जात नसल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडले. तसेच बेरोजगारी दूर करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारासाठी शहरात लघुउद्योग व कुटुरोद्योग सुरु करावेत, शहरातील नागरिकांच्या स्वास्थ्य व मनोरंजनाच्या दृष्टीने एक बगीचा उभारावा सरकारी दवाखान्यात अनेक अत्यावश्यक गोष्टींचा अभाव असून त्या सर्व सुविधांची पूर्तता करावी. अशा विविध प्रकारच्या मागण्यांचे निवेदन संघटनेकडून देण्यात आले.


निवेदनावर डीवायएफआयचे जिल्हा सचिव कॉ. नसीर शेख, आनंद वाहिवळ, अमन जोंधळे, सचिन नरनवरे, अजय खंदारे, जय एंगडे आणि तुषार मोगले आदींची नावे आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा