Breaking


त्रिपुरा हिंसाचाराचा निषेध आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून डीवायएफआयचे निवेदनपूर्णा, ता. १२ : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या युवक संघटनेकडून त्रिपुरा येथे अल्पसंख्यांकांवर व कम्युनिस्ट कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हिंसाचाराचा निषेध म्हणून व दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी आणि महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा न्याय मागण्यांना घेऊन सुरू असलेल्या संपाला पाठिंबा म्हणून पूर्णा तहसीलदारांमार्फत अनुक्रमे पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.


या दोन्ही निवेदनांवर डीवायएफआयचे जिल्हासचिव नसीर शेख आणि अजय खंदारे यांच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा