Breaking


स्पर्धा परीक्षेची विद्यार्थ्यांनी भिती बाळगू नये - संतोष लांडगे


शेवगाव / डॉ. कुंडलिक पारधी : शेवगाव येथील न्यू आर्ट्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज मध्ये प्रथम वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लांडगे उपस्थित होते.


स्पर्धा परीक्षेविषयी मार्गदर्शन करताना लांडगे म्हणाले की " विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धा परीक्षे विषयी भिती बाळगू नये. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. कोणाला तरी उच्च पदी बसवायचे असते या कारणातून या स्पर्धा परीक्षा जन्माला आल्या आहेत. तात्काळ योग्य - अचूक निर्णय क्षमता आणि सभोवतालच्या लोककल्याणकारी प्रश्नांची जाण आणि भान याची उकल करता यावी असाच स्पर्धेतील प्रश्नांचा कल असतो. आपला पदवी पर्यंतचा विविध विषयाचा अभ्यास आणि सभोवतालचे वास्तव सतत दृष्टीसमोर ठेवले तर या स्पर्धा परीक्षा सहज यश देऊन जातात. एकाग्रतेतून उत्तरे सापडतात. अनुभवातूनही योग्य उत्तरे पुढे येतात. या परीक्षेत काहीच पाठ करावे लागत नाही. उत्तर समोरच असते फक्त अंतर्मुखतेतून शोधायचे असते, असे प्रतिपादन लांडगे यांनी व्यक्त केले.

प्राचार्य डॉ.कुंदे यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधांचा व तंञज्ञानाचा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी सातत्याने उपयोग करुन घ्यावा असा आशावाद आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संयोजक डॉ.वसंत शेंडगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.गोकुळ क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा.मोहनराव वेताळ यांनी आभार मानले तर डॉ.अनिता आढाव यांनी सूञसंचालन केले.

गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापकांचा पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा