Breaking

एसटी कर्मचारी संपास ‘स्वराज अभियान’ने दिला पाठींबापुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरु आहे. इतर सर्व मागण्यांसह ‘एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे’ ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. ‘स्वराज अभियान’ महाराष्ट्र त्यांच्या या मागणीचे समर्थन करत असून त्यांची ही मागणी राज्य सरकारने त्वरित मान्य करून त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा, तसेच प्रवाशांची होणारी गैरसोयही संपवावी अशी मागणी स्वराज अभियानचे राज्य अध्यक्ष मानव कांबळे यांनी केली आहे.


कांबळे यांनी म्हटले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय किमान वेतानाएवढेही वेतन आज मिळत नाही, त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अतिशय हलाखीत जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळणे, कुटुंबियांना निवास मिळणे, वैध्यकीय व आरोग्य सुविधा मिळणे कठीण झाले आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी यांच्या वेतनात प्रचंड तफावत आहे, ती संपवणे आवश्यक आहे. सबब त्यांची ‘महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याची मागणी त्वरित मान्य झाली पाहिजे. समिती नेमून अहवाल मागवणे हे केवळ वेळ घालविण्याचे धोरण आहे, हा आत्तापर्यंतच्या सर्वच शासकीय सामित्यांबाबतचा सार्वत्रिक अनुभव आहे. राज्य सरकारने मानवतेच्या दृष्टीने विचार करून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून कर्मचारी आणि सामान्य प्रवासी यांना दिलासा मिळवून द्यावा असे आवाहन नागरी हक्क सुरक्षा समिती व स्वराज अभियान यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा