Breaking

निराधारांना दिवाळीत मोफत किराणा वाटुन रोटरी क्लब व अमोल आंधळे यांनी दिला आधारवडवणी, ता.४ : रोटरी क्लब ऑफ वडवणी आणि अमोल आंधळे संचालक डी.सी.सी.बँक यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी निमित्त समाजातील वंचित, अपंग, अंध निराधार अशा एकुण सत्तर कुटुंबांना १,१०० रु. प्रति किट प्रमाणे मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले. 


४ नोव्हेंबर रोजी आनंद मंगल कार्यालय येथे रोटरीचे पदाधिकारी व या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रमुख पाहुणे अमोल आंधळे यांच्या हस्ते या किराणा किटचे वाटप करण्यात आले. तिमिराकडुन तेजाकडे घेऊन जाणारा उत्सव म्हणजेच दिवाळी. हा आनंद द्विगुणित करतांना समाजातील अपंग, वंचित, निराधार कुटुंबाची ही दिवाळी आपल्या सोबतच साजरी व्हावी, या हेतुने रोटरी क्लब वडवणी गेली चार वर्षे सतत हा उपक्रम राबवत आहे. याही वर्षी निराधार कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी रोटरी क्लब वडवणी आणि अमोल आंधळे यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मंगल कार्यालय वडवणी येथे एकुण ७० निराधार कुटुंबांना मोफत किराणा किट वाटप करण्यात आले.


या प्रसंगी रोटरी अध्यक्ष प्रा.सतिश भालेराव यांनी प्रस्ताविक करुन प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे प्रायोजक अमोल आंधळे यांचे आभार मानले. तसेच रोटरीच्या वतीने त्यांचा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे अमोल आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना रोटरी जे करते ते चांगलेच असते, गेली चार वर्षे मी रोटरीचे काम पाहतोय ते जनहीताचेच असते आणि उत्कृष्टच असते, रोटरीने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो, असे गौरवउद्गार रोटरी बद्दल त्यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रम प्रसंगी प्रोजेक्ट चेअरमन वचिष्ट शेंडगे, प्रोजेक्ट को. चेअरमन अँड. श्रीराम लंगे, प्रमुख पाहुणे अमोल आंधळे (संचालक डी.सी.बँक) अध्यक्ष प्रा. सतिश भालेराव, सचिव किशन माने पाटील, विनायक बप्पा मुळे, अंकुश वारे, पत्रकार जानकीराम उजगरे, पत्रकार शेख ताहेर भाई, विशाल पतंगे, डॉ. जगदिश टकले, ज्ञानदेव आंधळे, आबासो आंधळे, माधव पुरी, आसाराम मस्के, गोरख आळणे, सुनिल कुलकर्णी, अशोक आजबे, जयदेव लांडे, डॉ. विजयकुमार निपटे, सुदाम शिंदे, अण्णा दुटाळ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऍड. श्रीराम लंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशनराव माने पाटील यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा