Breaking
आदिवासीचा इतिहास शोधला पाहिजे, लिहीला पाहिजे - डॉ. संजय दाभाडे


खेड : आदिवासी भागात क्रांतीकारक घडले आहेत, पण त्यांची दखल इतिहासात घेतली नाही. कारण लेखन करणारे हे आपण नव्हतो त्यांचा इतिहास शोधून काढला पाहिजे तो इतिहास इंग्रजी लिहीला आहे. या पुढे आपल्या आदिवासी भागात एक दिवस आदिवासी पुस्तक वाचन केले पाहिजे म्हणजे आपली पुढील पिढी ही इतिहास लिहू शकेल असे मत डॉ. संजय दाभाडे यांनी व्यक्त केले. 


साकुर्डी येथे वाघशिल्प अनावरण कार्यक्रम करण्यात आला. निर्मळवाडी ते वाघदरा अशी मिरवणूक काढली आली. वाघदरामध्ये वाघाचे शिल्प बसवण्यात आले. त्यानंतर सभेत रूपांतर झाले. 

आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे व महामानव बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. 

त्यावेळी कार्यक्रम अध्यक्ष डॉ.संतोष सुपे होते. साकुर्डी लोकनियुक्त सरपंच सौ ज्योती सुपे, ट्रायबल फोरमचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष मारुती खामकर, सोसायटीचे चेअरमन काशिनाथ लाडके, डॉ. मंगल सुपे, विमलाताई शिंगाडे, ट्रायबल फोरमचे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे, पिंपरी चिंचवड शिक्षक पतसंस्था उपसभापती राजू भांगे, वडेश्वरचे सरपंच गुलाब गभाले, मावळ तालुका अध्यक्ष कांताराम असवले, खेड तालुका कार्याध्यक्ष तानाजी भोकटे, उपाध्यक्ष संपत निधन, संजय निधन, सुरेश पढर तसेच साकुर्डी चे बिरसा यंग ब्रिगेड चे सामजिक कार्यकर्ते  पुणेकर, मुंबईकर,भोसरीकर, खेडकर, चाकणकर तसचे साकुर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लोहकरे, आभार माजी सरपंच किरण तळपे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा