Breaking


समाजहितासाठी आम्ही तुमच्या सोबत - ट्रायबल फोरमचे अध्यक्ष डॉ. हरीश खामकर


आंबेगाव : अनुसूचीत क्षेत्रातील कायम वास्तव्यास असलेल्या बिगर आदिवासी नागरिकांनी पेसा कायद्याचा सखोल अभ्यास करून आपले हक्क ग्रामसभेमार्फत मिळवावेत कारण पेसा कायदा हा अनुसूचित क्षेत्रातील प्रभावी कायदा असून पेसा कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायती  ह्यांना  स्वायता असून त्या ग्रामपंचायतीच्या मतदार यादीतील प्रत्येक नागरिकाला आपला मूलभूत हक्क मिळविण्याचा अधिकार  आहे.पेसा कायद्याद्वारे पेसा हक्क समितीनं   ग्रामसभेत आपल्या मागण्या मांडाव्यात .कायद्याने प्रश्न सोडवावेत समाजहितासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे मत ट्रायबल फोरमचे आंबेगाव तालुका अध्यक्ष डॉ हरीश खामकर यांनी आपले मत मांडले.


पेसा हक्क कृती समिती आंबेगाव व ट्रायबल फोरम संघटना यांच्या पेसा कायदा व बिगर आदिवासी समाजवर होणारे अन्याय या बाबत विचार मंथन कार्यक्रमाचे आयोजन शिनोली येथील टी.एस.बोऱ्हाडे यांच्या सभागृहात करण्यात आले होते या वेळी ते बोलत होते.

विचार मंथन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ट्रायबल फोरम संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ. हरीश खामकर तर ट्रायबल फोरमचे कार्याध्यक्ष दिपक चिमटे, उपाध्यक्ष सोमनाथ गेंगजे, मारुती तळपे, अंकुश करवंदे, सचिन भागीत, शंकर शिंगाडे, मनोज पारधी, विशाल दगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी पेसा हक्क कृती समितीचे अध्यक्ष डी बी बोऱ्हाडे, सचिव गौतमराव खरात खजिनदार पुरुषोत्तम फदाले, उपाध्याक्ष राम फलके, मंगेश बोऱ्हाडे सल्लागार सिताराम लोहट, आत्माराम बोऱ्हडे, शरीफ पटेल राम वागदरे, सुरेंद्र फदाले, अशोक जगदाळे, गोरक्षनाथ पोखरकर रोहिदास अमोंडकर आदी मान्यवर या विचार मंथन बैठकीस उपस्थित होते. 

यावेळी पेसा हक्क कृती समितीचे तालुका अध्यक्ष डी. बी. बोऱ्हाडे, सचिव गौतमराव खरात, खजिनदार पुरुषोत्तम फदाले, उपाध्यक्ष  राम फलके, सल्लागार आत्माराम बोऱ्हाडे, सिताराम लोहट यांनी बिगर आदिवासी समाजाची होणारी कोंडी आणि पेसा क्षेत्रात असुरक्षित कसे वाटत आहे, जातीयवादी संघटनांमुळे जातीयवाद वाढतो आहे या बाबत विचार मांडले.

या वेळी ट्रायबल फोरम चे कार्याध्यक्ष दीपक चिमटे म्हणाले की येथे समाजाची चूक नसून या भागात धरण झाले, अभयारण्य झाले त्या भागातील  नागरिकांना कधी विचारत घेतले नाही ते लादले गेले तसेच पेसा कायदा लागू झाल्यानंतर येथील ग्रामपंचायतींनी त्याची संपुर्ण माहिती घेणे आवश्यक होते, ग्रामसभा ही सर्वोच्च असून त्याद्वारे  समाजहिताचे अनेक प्रश्न सोडवू शकतात, सरकार दरबारी आम्ही पेसा हक्क कृती समिती सोबत असणार आहे.

तर ट्रायबल फोरम संघटनेचे उपाध्यक्ष सोमनाथ गेंगजे यांनी हा लढा सनदशीर मार्गाने लढला पाहिजे आज पर्यंत आपण सर्वच समानतेने रहात आलो आहे येथून पुढे ही असेच राहण्याचा प्रयत्न करू फक्त पेसा संघटनेने निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन  काम करू नये जनतेच्या हितासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. 

मारुती तळपे यांनी आदिवासी विकास विभागाचा निधींसोबत समाजकल्याण चा निधीही ग्रामसभेमार्फत मागावा त्यातून समाज घटकांचे प्रश्न मार्गी लागतील असे मत मांडले तर ट्रायबल फोरम संघटनेचे अंकुश करवंदे यांनी आदिवासी समाजाच्या जमिनी खरेदी विक्रीस आमचा कायम विरोध असून त्या साठी पेसा हक्क कृती समितीने आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे असे मत मांडले.

यावेळी दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी जेथे जेथे अन्याय होईल त्या ठिकाणी अन्याया विरुद्ध लढण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक खजिनदार पुरुषोत्तम फदाले यांनी केले. सूत्रसंचालन सचिव गौतमराव खरात यांनी केले तर आभार सल्लागार सिताराम लोहट यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा