Breaking


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सीटूने दिला पाठींबाधारूर : राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून धारूर मध्येही एसटी कर्मचारी संप करत आहे. त्यांच्या या संपाला सीटू संघटनेच्या वतीने तहसिलदार यांना लेखी निवेदन देऊन सीटू संघटनेने पाठिंबा दिला आहे.


सविस्तर असे की, राज्यामध्ये सध्या एसटी कर्मचारी यांचा संप सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनिकरण झाले पाहिजे, या मुख्य मागणीसह, संपाच्या काळात कर्मचारी यांच्यावर कोणत्याही प्रकारची निलबनाची कार्यवाही करू नये, संपाच्या काळात सीटू, किसान सभा आपल्या खांद्याला खांदा लावुन लढत राहील त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात इत्यादीसह अनेक मागण्याचे निवेदन तहसिलदार धारूर यांना देण्यात आले.


यावेळी सीटू संघटनेचे जिल्हा सचिव डॉ. अशोक थोरात, किसान सभेचे नेते कॉ. काशिराम सिरसट, कॉ. मोहन लांब, कॉ. मिरा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मधुकर चव्हाण, कॉ. ज्ञानदेव बोराडे, कॉ. संगिता थोरात, इंदताई खेपकर, कॉ. दादा सिरसट, कौशल्या शिंदे, सुधामती मुठाळ इत्यादी सीटू संघटनेचे कार्यकर्ते होते, तसेच एसटी कर्मचारी देखील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा