अमरावती : त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाने अमरावती येथे शुक्रवारी (ता.१२) बंद ठेवला होता, या बंदला हिंसक वळण लागले. या बंद दरम्यान अनेक ठिकाणी दगड फेक व तोडफोड करण्यात आली.
त्रिपुरातील मुस्लीम समाजावरील हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने रझा अकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारण्यात आला होता. यावेळी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी, अल्पसंख्यांक समाजावरील हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाई करावी या मागण्या करण्यात आल्या होत्या. या बंद दरम्यान दुपारी जमावाने अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड केली. यात २० ते २५ दुकानांचे नुकसान झाले आहे. तसेच सध्या मालेगाव आणि अमरावती येथे तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर करावा लागला. तसेच सौम्य लाठीमार करावा लागला.
त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 12, 2021
राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून म्हटले आहे की, त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा