Breaking
लुधियाना कोर्टात बॉम्बस्फोट २ ठार


लुधियाना : पंजाब राज्यातील लुधियाना येथे गुरुवारी जिल्हा न्यायालय इमारत परिसरात झालेल्या शक्तीशाली स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. स्फोटात इतरही चार जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. त्यामुळे हा स्फोट  आहे की घातपात याबाबतही स्पष्टता नाही.


प्राप्त माहितीनुसार, हा स्फोट लुधियाना कोर्टाच्या स्वच्छतागृहात झाला. या घटनेनंतर कोर्ट परिसरात मोठी धावपळ उडाली आणि घबराटही पसरली. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात दुपारी साधारण १२.२२ वाजणेच्या सुमारास ही घटना घढली. स्फोट इतका भयावह होता की, या स्फोटामुळे स्वच्छतागृहाच्या खिडक्यांची तावदाने फुटली, भींतींनाही तडे गेले. तसेच, आजूबाजूच्या दालनांच्या भींतींनाही तडे गेले. 

लुधियानाच्या जिल्हा न्यायालयात झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी म्हटले की, 'मी लुधीयानाला निघालो आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. काही देशविरोधी लोक अशा प्रकारच्या गोष्टी करु शकतात. सरकार सावध आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. कोणीही सुटणार नाही.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा