Breaking
ब्रेकींग : सैन्यदलाचे हेलिकॉप्टर कोसळून ४ ठार, सीडीएस जनरल बिपीन रावत गंभीर


उटी : भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तात्काळ वेलिंग्टन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  


दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या हेलिकॉप्टरमध्ये हवाईदलाचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तामिळनाडूतील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी (Niligiri Katteri) ही दुर्घटना घडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा