Breakingमाकपाचे ११ वे जिल्हा अधिवेशन नांदेड मध्ये जल्लोषात संपन्न


पक्ष वाढीसाठी जिल्हा कमिटी सक्षम - प्रा.उदय नारकर


नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ११ वे जिल्हा अधिवेशन दि.१  डिसेंबर रोजी नांदेड शहरातील बि.के.फंक्शन हॉल, येथे संपन्न झाले असून सकाळी ११.३० वाजता शहीद स्मारकास अभिवादन व ध्वजारोहण करून  अधिवेशनाची सुरवात करण्यात आली आहे.

सकाळी ११.०० वाजता माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य प्रा.डॉ.कॉ.उदय नारकर (कोल्हापूर) यांनी  खुल्या सत्राचे उदघाटन केले तर माजी आमदार गंगाधरराव पटणे हे प्रथम सत्राचे स्वागताध्यक्ष होते. प्रमुख उपस्थिती मध्ये  पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.पी.एस.घाडगे (बीड) व कॉ.किसन गुजर (नाशिक) यांची उपस्थिती होती. प्रथम सत्राचे अध्यक्ष कॉ.विजय गाभणे हे होते. ९५ प्रतिनिधी  व १५ स्वंयसेवक आणि दहा निरीक्षकांची नोंद झालेल्या  उपरोक्त त्रेवार्षिक अधिवेशनात विविध ठराव मांडण्यात आले असून दलित व महिलांवरील वाढते अत्याचार,महागाई,आरोग्य,शिक्षण तसेच बेरोजगारी या ज्वलंत प्रश्नावर चर्चा होऊन ठराव मांडण्यात आले व ते सर्व ठराव एकमताने पारित करण्यात आले आहेत. दुसऱ्या सत्राचे कामकाज जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम यांच्या प्रस्तावने नंतर सुरू करण्यात आले व कॉ.किशोर पवार, कॉ.विनोद गोविंदवार कॉ.बाजाजी कलेटवाड, कॉ.उज्वला पडलवार, यांनी अध्यक्षीय मंडळाची जबाबदारी पार पाडली.

जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम यांनी मांडलेल्या अहवालावर तालुका निहाय गट चर्चा झाली व प्रतिनिधींनी काही प्रश्न उपस्थित केले नंतर सचिवांनी प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर दिले.

अधिवेशनात उदघाटक तथा समारोपीय वक्ते कॉ.उदय नारकरांनी पुढील काळात पक्ष वाढीसाठी चांगली संधी असून तसे कार्य करण्यास जिल्हा कमिटी सक्षम असल्याचे मनोगत व्यक्त केले व पुढील आव्हाने समर्थपणे पेलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका कशा जिंकता येतील या साठी सर्वांनी रणनिति आखून कार्य करावे असे मनोगतात व्यक्त केले आहे.

राज्य कमिटी सचिव मंडळ सदस्य कॉ.प.एस.घाडगे व कॉ.किसन गुजर तसेच कॉ.विजय गाभणे यांनी देखील मार्गदर्शन केले आहे. सकाळी अकरा ते सकाळी अडीच वाजेपर्यंत चाललेल्या जिल्हा अधिवेशनात सर्वानुमते सचिव म्हणून कॉ.शंकर सिडाम यांची फेर निवड करण्यात आली असून नूतन जिल्हा कमिटी मध्ये कॉ.विजय गाभणे, कॉ.बालाजी कलेटवाड, कॉ.अर्जून आडे, कॉ.किशोर पवार, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.विनोद गोविंदवार, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.प्रल्हाद चव्हाण, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.जनार्धन काळे, कॉ.शैलीया आडे, कॉ.प्रभाकर बोड्डेवार, कॉ.अनिल आडे आदींची निवड झाली आहे. तर तीन जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. 

अधिवेशन भव्य व यशस्वी करण्यासाठी नांदेड शहर कमिटीने परिश्रम घेतले असून त्यामध्ये कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.अरुण दगडू, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.बंटी वाघमारे, कॉ.मगदूम पाशा, कॉ.मारोती केंद्रे यांच्यासह शहरातील प्रमुख कार्यकर्ते कॉ.जयराज गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.सुंदरबाई वाहुळकर, कॉ.मीना आरसे, विष्णूपंत एडकेवार, सचिन आंबटवार, कॉ.बबन वाहुळकर, कॉ.संतोष शिंदे, कॉ.मोहन दरोडे, कॉ.रफिक पाशा, सुभाषचंद्र गजभारे आदींची नावे आहेत. अधिवेशनात सांस्कृतिक मंचच्या वतीने कॉ. रवी भगत, कॉ.संजय मानकर, कॉ.प्रफूल कऊडकर, कॉ.माधव देशटवाड, कॉ.तुमगूडवार आदींनी क्रांतिकारी गिते सादर करून प्रतिनिधींना खिळून ठेवले होते.

कॉ.सुंदरबाई वाहुळकर यांच्या हस्ते स्मारकास पुष्प अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले होते.तर कॉ.करवंदा गायकवाड यांनी आभार प्रदर्शन करून अधिवेशन व कार्यक्रमाचा समोरोप केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा