Breaking
घोडेगाव प्रकल्प कार्यालयात आदिवासींच्या विविध प्रश्नांवर चर्चा - ट्रायबल फोरम ने केल्या विविध मागण्या


मंचर : घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश खंडारे, शिक्षण विभाग सहाय्यक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी यांना ट्रायबल फोरमच्या वतीने आदिवासी विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदन देऊन विविध मागण्या केल्या आहेत. 


निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती बोगस दाखला घेणारा व्यक्ती व देणारा अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अनुसूचित जमाती नोकरी, पेट्रोल पंप, गँस एजन्सी, शासकीय योजना, राजकीय पद या हडप केला आहेत. आदिवासी उमेदवार ची विशेष भरती मोहिम सुरू करण्याची मागणी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने 6 जुलै 2017 मध्ये दिलेल्या निर्णयाने अंमलबजावणी झाली पाहिजे. सामान्य प्रशासन विभागाने 21 डिसेंबर 2021 रोजी शासन निर्णय ची अमलबजावणी झाली पाहिजे. शासनाने 12500 रिक्त पदे असून तरी अजूनही ब-याच विभागाने जाहिरात प्रसिद्ध केलेल्या नाहीत. काही विभागाने जाहिरात प्रसिद्ध करूनही विशेष भरती प्रक्रिया पूर्ण केली नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिले गेले पाहिजे. शासकीय अधिकारी हे आदिवासी समाजासाबाबत विशेष भरती करणास डोळे झाक पणा करत आहे ही निंदनीय घटना आहे. तरी  तात्काळ विशेष भरती मोहिम सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन सुरू करावे लागेल या जबाबदार प्रशासन व सरकार असेल, असा इशारा देण्यात आला आहे.
 

ट्रायबल फोरम पुणे जिल्हा युवक अध्यक्ष विक्रम हेमाडे, पुणे विभागीय कार्याध्यक्ष तथा किवळेचे सरपंच मारुती खामकर यांच्या नेतृत्वाखाली भेट दिली. 

त्यावेळी प्रकल्प नियोजन समिती अशासकीय सदस्य विजय आढारी, प्रकल्प समिती सदस्य हरिभाऊ साबळे, सावळाचे सरपंच नामदेव गोंटे, खांडीचे सरपंच अंनता पावशे, माळेगाव चे सरपंच राजेश कोकाटे, कुसवली चे सरपंच बाळासाहेब दाते, इंगळूण चे सरपंच सुदाम सुपे, आंबेदरा चे सरपंच रमेश वाजे, माऊ चे पोलिस पाटील अंकुश मोरमारे,  वडेश्वरचे माजी आदर्श सरपंच गुलाब गभाले, प्रसिद्ध प्रमुख मधुकर कोकाटे, रामदास गभाले, अनिल कोकाटे, सागर तळपे, किसन गवारी, तानाजी पिचड सुरेश काठे, काळूराम मदगे, सोनू दाते आदी नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा