Breakingगरीब जनतेला मोफत रुग्णसेवा हे मानवतावादी कार्य आहे - सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे


पिंपरी चिंचवड : जागतिक महामारीचा सामना करताना मनपाच्या आरोग्य विभागाने सामाजिक संस्था,तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते,वैद्यकीय कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून शहराला कोरोना महामारीच्या संकटातून यशस्वी बाहेर काढले आहे.


रुग्णसेवे कडे आता मानवतावादी कार्य समजून जनआरोग्य अभियान व्यापक प्रमाणात गोरगरीब, वंचित घटकापर्यंत पोचवण्याचे काम बोधिसत्व  सहकारी रुग्णालय व इतर सामाजिक संस्था व संघटना  मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून करत आहे. ह्या आरोग्यसेवेच्या कार्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहील, असे आश्वासन पिंपरी चिंचवड मनपाचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोधडे यांनी उद्धाटन करताना दिले. ह्या वेळी नगरसेवक समीर मासुळकर हे उपस्थित होते.

बोधिसत्व सहकारी रुग्णालय,सिद्धार्थ बुद्ध विहार, बानाई इंजिनिअर्स असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी उपचार शिबिर सिद्धार्थ संघ बुद्धीविहार मासूळकरकॉलनी येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचा ३०४ नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर सुखदेवे, अध्यक्ष बोधिसत्व रुग्णालय यांनी केले.

डॉ. किशोर किशोर खिल्लारे हृदयरोग व

मधुमेह तज्ज्ञ, डॉ. किशोर लोंढे मधुमेह तज्ज्ञ, डॉ.रविंद्र साळवे उरोरोग तज्ज्ञ, डॉ.शैलेंद्र मेश्राम उरोरोग तज्ज्ञ, डॉ.सुरेंद्र बेंडे सर्जन, डॉ.रोहिणी नगरकर बालरोग तज्ञ, डॉ. संघमित्रा खोब्रागडे स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ.अंजली जाधव स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ. दिलीप वाळके स्त्रीरोग, डॉ.योगेश गाडेकर स्त्रीरोग तज्ज्ञ, डॉ.शिल्पा बिऱ्हाडे स्त्रीरोग तज्ञ, डॉ.रोहिणी गायकवाड त्वचारोग तज्ज्ञ, डॉ. उज्वला बेंडे जनरल प्रॅक्टीशनर, डॉ.मंगला आयरेकर जनरल प्रॅक्टीशनर, डॉ.चंद्रकांत वाळके जनरल प्रॅक्टीशनर, डॉ.ज्योत्स्ना वाघमारे, डॉ.शुभम उबरहंडे जनरल प्रॅक्टिशनर, डॉ. सोनाली साळवे कान नाक घसा तज्ज्ञ, डॉ. वर्षा जावळे होमिओपॅथी तज्ज्ञ, डॉ.स्नेहल खिल्लारे पेरीओडेंटोलॉजिस्ट, डॉ.यशवंत उजगरे प्रोस्थोडेंटीस्ट व इम्प्लांट सर्जन, डॉ.अनिल बिऱ्हाडे अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ.प्रमोद जाधव अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ.प्रकाश रोकडे नेत्ररोग तज्ज्ञ, डॉ.मयूर जावळे नेत्ररोग तज्ज्ञ, अरूणा पवार नेत्र चिकित्सा अधिकारी, डॉ.विकास कदम नेत्रचिकित्सा अधिकारी, डॉ.नितीन भिसे आयुर्वेद चिकित्सक, डॉ.सचिन नरवाडे आयुर्वेद चिकित्सक, डॉ.सायली जाधव , अनिल सुतार प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डी. डी. वाघमारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ व राजाभाऊ काळबांडे औषधी व्यवस्थापक या शहरातील  नामवंत अस्थी,नेत्र, हृदय, मधुमेह, रक्तदाब, नाक, कान, घसा इ क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर्सनी शिबिरामध्ये रुग्ण चिकित्सा केली.

वैद्यकीय सेवेचे समन्वयन डो किशोर खिल्लारे ह्यांनी केले तर शिबिराचे संयोजन  मनोज गजभिये, अनिल सूर्यवंशी, एस. एल. वानखेडे, सी. जी. बागडे, रविंद्र तांबे, विजय कांबळे यांनी शिबिराचे संयोजन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा