Breaking
'सरकार काम करत नाही, तर आम्हाला कलेक्टर करा' आदिवासी विद्यार्थीनी प्रशासनावर संतापली


मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) झाबुआ (Jhabua) येथील एका कॉलेज तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (College Girl Viral Video). ज्यात निवेदन घेण्यासाठी न आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना पाहून संतप्त विद्यार्थ्यीनीने प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत.


व्हिडिओमध्ये तरुणी म्हणत आहे की, 'तुम्ही येऊ शकत नसाल तर आम्हाला कलेक्टर करा, आम्ही सर्वांच्या मागण्या पूर्ण करु, आदिवासी मुले (Tribal children) लांबून आली आहेत, तुम्हाला निवेदन घ्यायलाही वेळ नाही.' या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वास्तविक, व्हायरल व्हिडिओमध्ये निर्मला चौहान ही विद्यार्थिनी आदिवासी कुटुंबातील आहे. निर्मला ही अलीराजपूर जिल्ह्यातील खंडाळा खुशाल गावची रहिवासी आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निवास भत्ता, शिष्यवृत्ती आणि बस भाड्यात सूट देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत होत्या. ज्यामध्ये निर्मला चौहान हिचा ही सहभाग होता. चंद्रशेखर आझाद आदर्श महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमारे 400 विद्यार्थ्यांनी विविध समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव केला होता. या आंदोलनात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश होता.

सुमारे तासभर घोषणाबाजी करुनही कोणी पोहोचले नाही

आंदोलक विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावले, त्यामुळे संतप्त विद्यार्थी कॅम्पसमध्येच धरणे धरुन बसले. सुमारे 45 मिनिटे 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली, मात्र तरीही त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी कोणीही अधिकारी आला नाही. यादरम्यान निर्मला चौहान ही विद्यार्थिनी प्रशासनाविरुध्द घोषणाबाजी करत होती.

'तुम्ही करु शकत नसाल तर आम्ही सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करु'

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी म्हणतेय, "नाहीतर साहेब, आम्हाला कलेक्टर बनवा. आम्ही कलेक्टर व्हायला तयार आहोत. सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करु साहेब, जमत नसेल तर. सरकार कोणासाठी बनवलंय, आम्ही इथे भीक मागायला आलो आहोत? महाराज, आम्हा गरिबांसाठी काही तरी व्यवस्था करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा