Breakingएस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन संपन्न


हडपसर / डॉ. अतुल चौरे : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी  मानवाधिकार दिनाबद्दल  नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी भितीपत्रक  प्रदर्शनाचे (Poster Presentation)  आयोजन करण्यात आले होते. 


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्या शुभहस्ते भितीपत्रक प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले जगभरातील प्रत्येक नागरिकाला आपल्या मुलभूत अधिकारांची आणि कर्तव्यांची माहिती असणे आवश्यक आहे. असे मत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी व्यक्त केले.


महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन' या विषयावर आधारीत  विविध प्रकारचे पोस्टर तयार केले होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपप्राचार्य डॉ. संजय जगताप व  उपप्राचार्य डॉ. संजय जडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अँटी रॅगिंग, विद्यार्थी तक्रार निवारण व माहिती अधिकार समितीच्या प्रमुख  प्रा. डॉ. निशा गोसावी व समितीचे सर्व सदस्य, प्रा.डॉ. किशोर काकडे, प्रा. डॉ. गजानन वाघ, प्रा. डॉ. एकनाथ मुंढे  उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अजित भोसले यांनी तर आभार प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा