Breaking
जुन्नर : एस.टी.कर्मचाऱ्यांचे हित जोपासता येत नसेल तर राजीनामे द्या - गणेश वाव्हळजुन्नर : "एस.टी.कर्मचाऱ्यांचे हित जोपासता येत नसेल तर मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत" असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा सहसचिव गणेश वाव्हळ यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नारायणगाव येथील बसस्थानकामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गेल्या महिनाभरापासुन चालू असलेल्या  एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाला जाहीर पाठींबा देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडी च्या तालुका अध्यक्ष निलमताई खरात, जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष सुरज वाजगे, वंचित बहुजन महिला आघाडी च्या कार्याध्यक्ष दिपाली थोरात, उपाध्यक्ष पुजा जगताप, रविंद्र खरात, सुमित थोरात, रेश्मा वाव्हळ तसेच एस टी कर्मचारी गणेश गाढवे, दिपक गवळी व एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी एस.टी.कर्मचारी संघटनेचे गणेश गाढवे यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी मांडल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा