Breaking
जुन्नर : ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आळेफाटा येथे रास्ता रोको आंदोलन


जुन्नर : आळेफाटा याठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बेळगाव या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या विटंबनेचा अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने निषेध करून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भव्य रास्ता रोको, चक्काजाम आंदोलन करण्यात आले.


ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील रद्द केलेले राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, राज्य मागासवर्ग आयोगाला जनगणना करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, राज्य मागासवर्ग आयोगाचे स्थापना होऊन ९ महिने उलटले तरी राज्य मागासवर्गीय आयोगाचे काम चालू होऊ शकले नाही, त्यामुळे राज्य सरकार न्यायालयात राज्यामध्ये मध्ये असलेली ओबीसीची आकडेवारी न्यायालयात न दिल्याने न्यायालयाने देखील ओबीसीचे आरक्षण स्थगित ठेवून राज्यांमध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, नगर पंचायती, यामध्ये ओबीसी च्या जागा सोडून इतर निवडणुका घेण्याचे सूतोवाच निवडणूक आयोगाला दिले आहेत, त्यामुळे 54 टक्के पेक्षा जास्त असलेल्या ओबीसी समाजावर खूप मोठा अन्याय झाल्या, ओबीसी मागासलेला समाज हा जाणून बुजून राजकारणापासून दूर ठेवून समाजाचा विकास थांबून ओबीसी समाजाला राजकारणाच्या प्रवाहापासून दूर ठेवण्याचं काम राज्यकर्ते करत आहे, त्यामुळे तातडीने जातनिहाय जनगणना करून आमचं हक्काचं मंडल आयोगाने दिलेले राजकीय आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे, अशी भावना समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश भुजबळ यांनी व्यक्त केली. 

जर राज्य शासनाने ताबडतोब राज्य मागासवर्ग आयोगाचे काम चालू केलं नाही तर संपूर्ण राज्यामध्ये रास्ता रोको व चक्काजाम आंदोलने करून संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ओबीसी समाज हा शांतताप्रिय व लोकशाहीच्या मार्गाने जाणारा आहे. परंतु त्यांच्या शांत स्वभावाचा अंत राज्यकर्त्याने पाहू नये, नाहीतर होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी राज्य व केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
 
यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष निलेश भुजबळ यांनी यापुढील आंदोलन हे अतिशय तीव्र स्वरूपाचे असेल असे सरकारला ठणकावून सांगितले. आळेफाटा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. 

यावेळी आळे गावचे उपसरपंच उदय पाटील भुजबळ, ज्ञानेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष चारुदास साबळे, विशाल महाराज गडगे, अनिल वाघुले, स्वप्नील गडगे, सुभाष वाघोले, रुपेश भुजबळ, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सीताराम अभंग, अशोक गडगे, दत्तात्रय गडगे, नितीन भुजबळ, किशोर कोरडे, मनोज शिंदे, जालिंदर आहेर, समता परिषदेच्या जिल्हा संघटक दीप्ती भुजबळ, लता भुजबळ व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, तसेच समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. 

ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, ओबीसी जागा हो समतेचा तो धागा हो, बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण डोळ्यादेखत चाललेलं ते गेले, आता तरी जागा हो अशा स्वरूपाच्या घोषणा देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा