Breaking
जुन्नर : महाविकास आघाडीकडून संजय काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !


पुणे / रफीक शेख : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी आज कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती संजय काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध संस्थांचे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संजय काळे यांना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन आमदार अतुल बेनके यांनी केले. तर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन सत्यशील शेरकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा