Breaking
जुन्नर : आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत सायली कुरकुटेचे यश


जुन्नर : सोमेश्वरनगर येथे झालेल्या आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत आळे (ता जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव महाविद्यालयातील सायली कुरकुटे हिने सत्तावन्न किलो वजनगटात प्रथम क्रमांक पटकावला तिची अखिल भारतीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सोमेश्वरनगर येथील एम. एस. काकडे महाविद्यालयात कुस्तीच्या आंतरविभागीय स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये आळे महाविद्यालयाच्या सायली कुरकुटे हिने तिच्या गटात लढती चितपट करत प्रथम क्रमांक पटकावला. 

संस्थेचे अध्यक्ष भाऊ कु-हाडे, उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, खजिनदार रोहिदास पाडेकर, किशोर कु-हाडे, ज्ञानेश्वर कु-हाडे, प्रसन्न डोके, जी. एल. गुंजाळ, शिवाजी गुंजाळ, बबन सहाणे, अर्जुन पाडेकर, अरुण हुलवळे, राजेंद्र कु-हाडे, प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी मार्गदर्शक कॅप्टन रावसाहेब गरड, श्रृद्धा जाधव व सायलीचे खेळाडू यांचे अभिनंदन करत सत्कार केला.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा