Breaking
जुन्नर : चोरट्यांनी भरदिवसा लांबवली ज्येष्ठ नागरिकाची सोनसाखळी


जुन्नर : खामुंडी ( ता. जुन्नर) येथे मोटारसायकलवरुन आलेल्या दोघाजणांनी एका जेष्ठ नागरिकास मास्क घातला नाही मास्क घाला असे सांगून त्यांच्या अंगावरील दिड तोळे वजनाची सोनसाखळी लांबविली असल्याची घटना गुरूवारी ( दि. १६) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


याबाबत मिळालेली माहिती अशी की खामुंडी येथे गुरूवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास येथील बेंदाडपट शिवारात मोटारसायकलवरुन आलेल्या दोघाजणांनी नामदेव काशिबा शिंगोटे या सत्तर वर्षीय जेष्ठ नागरिकास तुमच्या तोंडाला मास्क नाही. मास्क लावा असे सांगत त्यांची सुमारे दिड तोळे वजनाची सोनसाखळी लांबविली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल केरुरकर, पोलिस हवालदार नरेंद्र गोराणे, नामदेव कांबळे, जोतीराम पवार, रामेश्वर आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन सी सी टीव्ही फुटेच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

या प्रकरणी या दोन चोरांच्या विरोधात ओतुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर तालुक्यात चोरींच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात संमोहित करुन अंगावरील दागिणे चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. भर दिवसा अशा घटना घडत असल्यामुळे नागरीकांमधुन भीतीचे वातावरण आहे.

जुन्नर तालुक्यात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून या प्रकरणी अद्यापही चोरांचा पकडण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरीकांमधुन भीतीचे वातावरण आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा