Breakingजुन्नर : वैभव गोडे याची नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र अंडर - १६ मध्ये निवड !


जुन्नर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यातील तळेरान गावचे सुपुत्र वैभव भिमा गोडे याची नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेत महाराष्ट्र अंडर - १६ मध्ये निवड झाली आहे. 'महाराष्ट्र जनभूमी' बोलताना वैभव म्हणाला, "मला खेळाची लहानपणापासून आवड होती. त्याबाबत मी नियमित प्रयत्न करत होतो. माझ्या वडिलांना खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी मला NCL ( नँशनल क्रिकेट लीग ) या स्पर्धेत भाग घेण्यास प्रोत्साहन दिले. नवी मुंबई ( बेलापूर ) येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्या चाचणी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे महाराष्ट्र ( Under - 16 ) एकूण १५ खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यामध्ये माझी ही निवड झालेली असून पुढील स्पर्धा या राज्याबाहेर खेळवण्यात येणार आहेत."


वैभवचे वडील भिमा गोडे हे मुंजाबावस्ती, धानोरी, जि. पुणे येथे राहतात. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील तळेरान पश्चिम आदिवासी भागातील आहेत. वैभवच्या निवडीमुळे जुन्नर परिसरातून कौतुक केले जात आहे.

1 टिप्पणी: