Breakingकागल : संदेश जाधव यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा सचिवपदी निवड !


कागल (कोल्हापूर) : आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शाखा लिंगनुर कापशी परिसर यांचे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले. या वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व जन संघटनांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी सामाजिक, वैचारिक, राजकीय कामांची चर्चा झाली. आणि पुढील तीन वर्षासाठी नवीन कमिटी स्थापन केली. 


यावेळी संदेश जाधव यांची सचिवपदी तर नामदेव भोसले, डॉ. प्रवीण जाधव, रेवती मडके, शिल्पा चेचर, बाळासाहेब कामते, विनायक सुतार, राजेंद्र आळवेकर, संगीता कामते यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. 

अधिवेशनास सुरुवात दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ST कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्याचा, आणि केंद्र सरकारने लावलेल्या खाजगीकरणाच्या सपाट्याला विरोध करण्याचा ठराव मजूर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा